वाघोलीकरांनो काळजी घ्या...; आता `एवढे` कोरोना बाधित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

वाघोलीतील कोरोना बाधितांची संख्या 14 असली तरी अॅक्टिव्ह रुग्ण चारच आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

वाघोली (पुणे) : येथील 37 वर्षीय ग्रामपंचायत सदस्यांसह 30 वर्षाचा आयटी कर्मचारी व त्याचे दीड महिन्याचे बाळ ठणठणीत होऊन गुरुवारी सायंकाळी घरी परतले. त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. वाघोलीतील कोरोना बाधितांची संख्या 14 असली तरी अॅक्टिव्ह रुग्ण चारच आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीने केले आहे.

कुत्र्याच्या हल्ल्यात `त्याने` गमावला जीव

सुमारे दोन लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या वाघोलीत 14 जण कोरोना बाधित झाले. यातील दोन जण बधितांच्या कुटुंबातील आहेत. यामधील 10 जण ठणठणीत बरे झाले. चार जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाघोलीतील अनेक दुकाने ही सुरू झाली असून आर्थिक घडीला हळू हळू सुरुवात होत आहे. पुणे नगर महामार्गावर व पुणे शहराच्या बॉर्डरवर असलेल्या वाघोलीत कोरोनाचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी लोक प्रतिनिधीसह सर्व शासकीय यंत्रणा परिश्रम घेत आहेत. येथील बी. जे. एस  क्वारंटाईन सेंटरमध्ये स्वॅब घेण्याची सुविधाही सुरू करण्यात आली आहे.  

आणखी वाचा- लाॅकडाउन वाढणार; पण...
      
 44 जणांचे रक्तदान

वाघोली हौसिंग सोसायटीच्या वतीने वाघेश्वर मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. केईएम रक्तपेढीच्या मदतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ४४ जणांनी रक्तदान केले. रक्तदान करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. सर्व नियम पाळून रक्तदान शिबीर संपन्न झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 person are affected by corona in wagholi