
पुणे : मुलांच्या लसीकरणासाठी आता ४० केंद्र
पुणे : शहरात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होत असताना आता यासाठीच्या केंद्रांची संख्या ३५ ने वाढवून ४० करण्यात आली आहे.पुणे शहरात १५ ते १८ या वयोगटातील सुमारे २ लाख ६० इतकी लसीकरणास पात्र संख्या आहे. या गटासाठी फक्त कोव्हॅक्सीन लस दिली जाणार आहे. महापालिकेने ३ जानेवारीपासून लसीकरण सुरू करताना पाच केंद्र निश्चित केली होती. मात्र, शहरातील लाभार्थ्यांची संख्या असल्याने हे केंद्र अपुरे पडणार आहेत.(40 centers for vaccination of children)
हेही वाचा: आता शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार Good Touch-Bad Touch चे प्रशिक्षण
तसेच ५० टक्के लस ही आॅनलाइन तर ५० टक्के थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी उपलब्ध असल्याने लसीकरणासाठी या पाच केंद्रांवर मोठी गर्दी होऊन गोंधळ झाला असता. त्यामुळे आता केंद्र संख्येत वाढ करण्यात आली आहे.महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘‘पात्र लाभार्थ्यांची संख्या, एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यामुळे १५ ते १८ वयोगटासाठीच्या लसीकरण केंद्रांची संख्या ५ वरून ४० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण वेळेत, वेगाने आणि सुकर करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
Web Title: 40 Centers For Vaccination Of Children
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..