Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

भाजपकडून ‘अब की पार ४०० पार’ अशी घोषणा केली जात असली तरी २५० जागांवरच ते अडकतील अशी राजकीय स्थिती देशात दिसून येत आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Sakal

पुणे : भाजपकडून ‘अब की पार ४०० पार’ अशी घोषणा केली जात असली तरी २५० जागांवरच ते अडकतील अशी राजकीय स्थिती देशात दिसून येत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण दिसत असले तरी महायुती आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी २४ जागा मिळण्याची शक्यता आहे, असे असे प्रतिपादन राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघ आयोजित 'लोकसभा निवडणुकीची दिशा आणि महाराष्ट्राचा राजकीय कल 'या विषयावर ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघ अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘ ही निवडणूक २०१९ प्रमाणे नाही तर २०१४ प्रमाणे लढली जात आहे. पहिल्या टप्प्यात भाजपने ४०० पेक्षा जास्त जागांचा दावा करणारा प्रचार केला, पण आता तो कमी झाला आहे. विविध ठिकाणचे आकडे पडताळणी केल्यानंतर देशात २५० जागांवर अडकतील असे दिसून येत आहे.

महाराष्ट्रात अजूनही आदर्शांवर निवडणूक लढवली जात आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान, स्थानिक मुद्दे यावर चर्चा होत आहे. केंद्र सरकार मध्ये कोणत्या पक्षाला बसवायचे व कोणाला नाही याची निर्णायक भूमिका घेत असल्याने असल्याने बिहार,

कर्नाटकपेक्षा यावेळी संपूर्ण देशात महाराष्ट्रात काय होणार याकडे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मतदान झाले आहे, आता निमशहरी व शहरी भागातील मतदानाचे टप्पे आहेत. त्यानुसार राजकीय पक्षांची प्रचाराची पद्धत बदलत आहे, असेही पवार यांनी सांगितले.

पवार म्हणाले

- लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून २००९ किंवा २०१४ च्या पातळीवर सुरू आहे. ती २०१९ सारखी नाही.

- नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशभर मान्य असून त्या भोवती निवडणूक मुद्दे फिरत आहे.

- २०१९ च्या निवडणुकीतील राहुल गांधी आणि आताचे राहुल गांधी पूर्णपणे वेगळे आहेत.

- भारत जोडो यात्रेतून त्यांनी त्यांचे नेतृत्व सिद्ध केले

- या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांना पाठबळ मिळत आहे.

- या निवडणुकीत वेगवेगळे ४० मुद्दे असून, ज्यांच्याकडे १५ ते २० मुद्द्यांची ताकद आहे, ते विजयी होतील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com