pune grand tour
sakal
- प्रसाद कानडे
पुणे - पुणे शहर व जिल्ह्यात तब्बल ४१३ किलोमीटर लांबीचे नवीन रस्ते तयार केले जाणार असून, ३४८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर नव्याने काम केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम केले जाणार असून, यासाठी सुमारे ६२७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सायकल स्पर्धेसाठी रस्त्यांचा कायापालट होणार असला तरीही यामुळे पुणे शहर व जिल्हातील वाहतुकीला गती येणार आहे. शिवाय रस्त्याच्या निमित्ताने पर्यटन स्थळे, किल्ले, धरणे व धार्मिकस्थळांनादेखील जोडले जाणार आहे.