भोरमध्ये दोन तासात ४३ टक्के मतदान

विजय जाधव
Tuesday, 1 December 2020

आमदार संग्राम थोपटेंसह राजकीय पदाधिका-यांनी बजावला मतदानाचा हक्क.

भोर ः पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीच्या मतदारानासाठी भोरमध्ये उत्फुर्त 
प्रतिसाद मिळाला. आमदार संग्राम थोपटे आदींसह तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांनी शहरातील 
नगरपालिकेच्या शाळा क्रमांक ३ मधील मतदान केंद्रावर मतदान केले.

पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धारणे, भाजपचे शहराध्यक्ष सचिन मांडके आदींनी सहकार्यांसमवेत मतदारांना मतदान कक्ष व मतदान प्रक्रीयेबाबत माहिती दिली. भोर तालुक्यातील ५ आणि वेल्हे तालुक्यातील २ अशा एकून ७ मतदान केंद्रांवर सकाळी १० वाजता मतदान प्रक्रीया सुरु झाल्यापासून मतदारांची गर्दी होती.

सकाळी १२ वाजेपर्यंत शिक्षक मतदारसंघासाठी ४२.७४ टक्के मतदान झाले. ५८५ शिक्षक मतदारांपैकी २५० मतदारांनी मतदान केले.  पदवीधर मतदारसंघासाठी २९.३९ टक्के मतदान झाले. २ हजार ८२ पदवीधर मतदारांपैकी ६१२ मतदारांनी मतदान केले. भोर शहरातील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक तीन वर सर्वाधिक मतदार असल्यामुळे तेथे जास्त गर्दी होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रत्येक मतदान केंद्रावर वोटर फॅसीलीटेशन सेंटर, मतदान मदत कक्ष, आरोग्य कक्ष, अपंग व ज्येष्ठांसाठी प्रतिक्षालय, महिलांसाठी तात्पुरते पाळणाघर व हात धुण्यासाठीचा कक्ष असे सहा कक्ष उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारांना कुठलाही त्रास होत नाही. याशिवाय पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात आहे. काही शिक्षक महिला मतदारांनी लहान बालकांना घेवून मतदानाचा हक्क बजावला. अतिरिक्त साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांनी मतदान केंद्रांना भेट देवून 
परिस्थितीची पाहणी केली.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 43% turnout in two hours in the morning