esakal | पुणे : अकरावीसाठी आतापर्यंत ४३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
sakal

बोलून बातमी शोधा

Admission

पुणे : अकरावीसाठी आतापर्यंत ४३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत झालेल्या तीन नियमित फेऱ्यांदरम्यान जवळपास ४३ हजार १८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तिसऱ्या फेरीत प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ३८ टक्के विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश निश्चित केला आहे. दरम्यान आतापर्यंत प्रवेशापासून वंचित असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश फेऱ्यांची प्रतीक्षा लागली आहे.

केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतंर्गत तीन नियमित प्रवेश फेऱ्या आतापर्यंत झाल्या आहेत. तिसऱ्या फेरीत जवळपास नऊ हजार २६१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली होती. त्यातील तीन हजार ५३५ विद्यार्थ्यांनी बुधवारपर्यंत प्रवेश निश्चित केले आहेत. पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रातील ३१६ महाविद्यालयांमधील एक लाख १२ हजार ९६५ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी ८६ हजार १३ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून त्यातील ७८ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहेत. तर ७८ हजार १७५ विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत ४३ हजार १८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.

हेही वाचा: बारामतीत गणेश विसर्जनासाठी पोलिसांकडून नियमावली जाहीर

नियमित फेऱ्यांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची आकडेवारी :

नियमित फेरी : प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी : प्रवेश घेतलेले विद्यार्थी : महाविद्यालयांनी प्रवेश नाकारलेले विद्यार्थी : विद्यार्थ्यांनी रद्द केलेले प्रवेश

पहिली फेरी : ३८,८३१ : २४,४६८ : ११० : २९७

दुसरी फेरी : १५,९६७ : ७,५८७ : ५२ : ८८

तिसरी फेरी : ६,२६१ : ३,५३५ : १८ : २१

कोट्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी :

कोटा : महाविद्यालयांची संख्या : उपलब्ध जागा : प्रवेश घेतलेले विद्यार्थी : प्रत्यार्प्रित जागा: रिक्त जागा

इनहाऊस : २३८ : ८,३५१ : ३,९०० : १,२४२ : ३,२०९

अल्पसंख्याक : ६७ : ११,५०८ : २,६८४ : ६,०४७ : २,७७७

व्यवस्थापन : ३०४ : ५,४०७ : १,०१३ : ८५९ : ३,५३५

loading image
go to top