esakal | बारामतीत गणेश विसर्जनासाठी पोलिसांकडून नियमावली जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

Police

बारामतीत गणेश विसर्जनासाठी पोलिसांकडून नियमावली जाहीर

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे

माळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत माळेगाव, सांगवी, नीरावागज आदी वाडीवस्तीवर सध्या पोलिसांच्या नजरेतून शिस्तबद्ध गणेश उत्सह साजरा करताना गणेशभक्त दिसून येत आहेत. `शब्बास गणेश भक्तांनो.... आता आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जनाची वेळ जवळ आली आहे.

विसर्जनाच्यावेळीही ठरवून दिलेले नियम पाळून पोलिस प्रशासनाला सहकार्य़ करा,` असे आवाहन पोलिस निरिक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलिस निरिक्षक राहूल घुगे यांनी आज केले. रविवार (ता. १९) रोजी आनंत चतुर्थी दिवशी गणपती विसर्जन होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर पोलिस प्रशासनाने कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व कोरोना प्रादुर्भाव विचारात घेवून आवश्यक ती तयारी सुरू केली आहे. त्याअनुषंगाने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह भक्तांना पोलिसांनी काही नियमावली ठरवून दिली आहे. त्याबाबत अधिकारी श्री. ढवाण, श्री. घुगे हे पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा: आरआयएमसी मध्ये पुण्यातील अनिरुद्ध भोसलेची निवड

दरम्यान, पोलिस प्रशासनाने ठरवून दिलेली नियमावली पुढील प्रमाणे - कोणीही विसर्जन मिरवणूक आयोजित करू नये, विसर्जनाची आरती गणपती मंदिरासमोरच कमी सदस्यांमध्ये करावी, विशेषतः विसर्जनासाठी माळेगाव नगरपंचायतीच्या वतीने कृत्रिम विसर्जन तलाव तयार केले आहेत. त्यामध्ये माळेगाव कारखाना (शिवनगर), माळेगाव खुर्द रोडवर विसर्जन तलावाची ठिकाणे आहेत. विसर्जन तलावांच्या ठिकाणी कोणीही विनाकारण थांबू नका गर्दी करू नये, तात्काळ आपले मंडळाचे व घरगुती गणपतीचे विसर्जन करून जागा मोकळी करावी, विसर्जनस्थळी येताना सर्वांनी मास्कचा वापर करावा, विना मास्क मिळुन येणार भाविकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, विसर्जनस्थळी सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे, शासनाने गणपती विसर्जन विषयक दिलेल्या आदेशाचा भंग करून जर कोणी मिरवणूक काढली किंवा विनाकारण गर्दी केली तर त्यांचेवर गुन्हे नोंद करण्याचे आदेश आहेत.

loading image
go to top