esakal | बारामतीत 47 लाखांचा गांजा जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

Crime1.jpg

बारामती तालुका पोलिसांनी काल रात्री केलेल्या कारवाईत तब्बल 47 लाखांचा गांजा असलेला टेंपो मुद्देमालासह ताब्यात घेतला. या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे.

बारामतीत 47 लाखांचा गांजा जप्त 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती तालुका पोलिसांनी काल रात्री केलेल्या कारवाईत तब्बल 47 लाखांचा गांजा असलेला टेंपो मुद्देमालासह ताब्यात घेतला. या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वेगाने कारवाई करून पोलिसांनी हा अमली पदार्थाचा साठा जप्त केला. बारामती-पाटस रस्त्यावर ही कारवाई झाली. 

आरोग्य सुविधांचे ‘ऑपरेशन’ गरजेचे! 

याप्रकरणी विजय जालिंदर कणसे (वय 26, रा. कानरवाडी, ता. कडेगांव जि. सांगली), विशाल मनोहर राठोड (वय 19, रा. नागेवाडी, विटा, ता, खानापूर जि. सांगली), नीलेश तानाजी चव्हाण (वय 32, रा. आंधळी, ता. माण, जि. सातारा) व योगेश शिवाजी भगत (वय 22, रा. साबळेवाडी, शिर्सुफळ, ता. बारामती) या चौघांविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.