esakal | रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणी वाघोलीत आतापर्यंत 5 जण पकडले; नागरिकांचा तीव्र संताप

बोलून बातमी शोधा

रेमडेसिव्हीर
रेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणी वाघोलीत आतापर्यंत 5 जण पकडले; नागरिकांचा तीव्र संताप
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाघोली : एकीकडे कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी मदतीचे हात पुढे येत असताना दुसरीकडे रुग्णांसाठी फायदेशीर ठरणारे रेमडेसिव्हीर काळ्या बाजारात विकणारे महाठग ही कमी नाही. वाघोलीत या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर 3 रेमडेसिव्हीर ताब्यात घेण्यात आले. या महाठगा विरोधात नागरिकांचा तीव्र संताप होत आहे.

आठवड्यापूर्वी वाघोलीतील एका स्थानिक व्यक्तीला हा काळाबाजार करताना पकडण्यात आले. विशेष म्हणजे हा व्यक्ती दुसऱ्या रुग्णांना मोफत रेमडेसिव्हीरची मदत करू शकेल एवढा श्रीमंत आहे. मात्र काही हजार रुपयांच्या हव्यासा पोटी त्याने ते काळया बाजारात विकण्याचा प्रयत्न केला. हातात जाड सोन्याचे कडे व गळ्यात जाड चैन घालणारा हा व्यक्ती तेच रेमडेसिव्हीर एखाद्या रुग्णांसाठी मोफत एखाद्या रुग्णालयात देऊ शकला असता. मात्र पैश्याची हव्यास म्हणतात ती हीच. ज्या दिवशी त्याला पकडण्यात आले. त्या दिवशी अनेकांना आश्चर्यही वाटले. मात्र या कृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा: खासदार राजीव सातव व्हेंटिलेटरवर; प्रकृतीबद्दल विश्वजीत कदम यांनी दिली माहिती

सोमवारीही पुणे शहर पोलिसानी काळाबाजार करताना दोघांना रंगेहात पकडले. ज्यांच्याकडून त्यांनी घेतले होते. त्या दोघांनाही पकडण्यात आले. यामधील एक जण वाघोलीतील एका मोठ्या रुग्णालयातील लॅब तंत्रज्ञ आहे. तर अन्य एक जण थेरगाव येथील व दोघे वाघोलीतीलच आहे. चौघेही 20 ते 30 वयोगटातील आहे.

रेमडेसिव्हीरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना किती आता पिटा करावा लागला. हे सर्वांनीच पाहिले आहे. मात्र काही हजार रुपयांसाठी असा प्रकार करणाऱ्या या महाठका विरोधात तीव्र संतापच सर्वत्र व्यक्त होत आहे. एकीकडे प्लाझ्मा दान करून दुसऱ्यांना जीवनदान देणारे तर दुसरीकडे काळाबाजार करून रुग्णांचा एका प्रकारे जीव घेणारे हे महाठग आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी या महाठगाना कडक शिक्षा होणे हाच पर्याय असल्याची प्रतिक्रिया नागरिक देतात.