मेडीकलसाठी दुकान देण्याच्या बहाण्याने 5 लाखांची फसवणूक; सराईत गुन्हेगारासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार यांना त्यांच्या पत्नीसाठी मेडीकल सुरू करुन द्यायचे होते. त्यासाठी ते दुकानाच्या शोधात होते. दरम्यान, त्यांची संशयित आरोपींशी ओळख झाली. त्यांनी फिर्यादी यांना बिबवेवाडी येथे दुकान मिळवून देण्याचे फिर्यादी यांना आश्‍वासन दिले.

पुणे : मेडीकल सुरू करुन देण्यासाठी दुकान देण्याचा बहाना करुन चौघांनी एका व्यक्तीला तब्बल पाच लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात सराईत गुन्हेगारासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राया अनंतराव भोसले, डॉ रवींद्र माणिकराव गायकवाड, आसिफ लतिफ शेख व अस्लम इनामदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कुणाल शामराव पवार (वय.31, रा. कोणार्क गार्डन, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार यांना त्यांच्या पत्नीसाठी मेडीकल सुरू करुन द्यायचे होते. त्यासाठी ते दुकानाच्या शोधात होते. दरम्यान, त्यांची संशयित आरोपींशी ओळख झाली. त्यांनी फिर्यादी यांना बिबवेवाडी येथे दुकान मिळवून देण्याचे फिर्यादी यांना आश्‍वासन दिले. त्यानंतर विविध प्रकारची कारणे सांगून फिर्यादी यांच्याकडून तीन डिसेंबर 2019 या दिवशी पाच लाख रुपयांची रक्कम घेतली. त्यानंतर फिर्यादी यांनी संशयित आरोपींकडे वेळोवेळी दुकान देण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी फिर्यादीला प्रतिसाद दिला नाही. त्याचबरोबर आत्तापर्यंत फिर्यादीला दुकानाचा ताबा दिला नाही.

गळ्यातील पट्ट्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यातून वाचला 'टायगर

दरम्यान, फिर्यादी यांनी दुकान मिळत नसल्याचे लक्षात घेऊन त्यांच्याकडे पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार देत फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. संशयित आरोपींपैकी राया भोसले हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात 2018 मध्ये याच स्वरुपाचा आर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणात पोलिसांनी त्यास अटक केली असून सध्या तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक काळे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 lakh fraud on the pretext of getting a shop to start a medical