Pune Traffic: पुणे-सोलापूर महामार्गावर ५ ते ७ कि.मी. वाहतूककोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Traffic

Pune Traffic: पुणे-सोलापूर महामार्गावर ५ ते ७ किमी वाहतूककोंडी

पुणेः टॅफिक जॅमने नेहमी त्रस्त असलेल्या पुणेकरांना आजही हा मनस्ताप सहन करावा लागला. आज सकाळी पुणे-सोलापूर महामार्गावर ५ ते ७ किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.

पुण्यात वाहतूककोंडी होण्यासाठी थोडंबहूत कारणंही पूरेसं असतं. त्यामुळे दोन-पाच किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तासभर लागू शकतो. आजहीअशीच परिस्थिती पहावयास मिळाली.

आज शुक्रवारी पुणे-सोलापूर महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना तास-दीड तास एकाजागी ताटकळत थांबावं लागलं. हडपसर पुलावर शेकडो वाहनं अडकून पडली. त्यामुळे इच्छितस्थळी पोहोचण्साठी निघालेल्या नागरिकांच्या वेळेचा बट्ट्याबोळ झाला.

टॅग्स :Pune NewsTraffic