इंदापूरात 50 कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

डॉ. संदेश शहा
Thursday, 14 May 2020

- परराज्यातून कामानिमित्त आलेल्या 50 कुटुंबास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

इंदापूर : इंदापूर चेतना फाऊंडेशनच्या वतीने शहरात इतर राज्यातून कामानिमित्त आलेल्या 50 कुटुंबास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव विलास भोसले आणि सोमनाथ माने यांनी हे वाटप केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदापूर शहरात बाहेरच्या राज्यातील फरशी, बांधकाम, सेट्रींग कामगार तसेच सरडेवाडी गावात गरजू व शेतमजूर कुटुंब आहेत. त्यांना चेतना फाऊंडेशनच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन गहू ५ किलो, तांदुळ २ किलो, तेल १ पुडी, साखर १ किलो तसेच चहा पुडा, साबण इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी प्रसंगी बोराटे, सुनिल अडसुळ, प्रशांत शेटे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 Family got help of Essential Commodities in Indapur

Tags
टॉपिकस
Topic Tags: