Pune News : मंचर येथे उंबर ढाब्या समोर 50 फूट उंचीचे झाड कोसळले, तीन वाहनांचे नुकसान

पाऊस व गारपीट सुरू झाल्यानंतर प्रवास करणारे अनेक जण वाहन झाडाच्या आडोशाला उभे करतात.
50-feet tall tree fell manchar damaging three vehicles pune marathi news
50-feet tall tree fell manchar damaging three vehicles pune marathi newsSakal

मंचर : जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर उजव्या कालव्या शेजारी असलेल्या उंबर ढाब्यासमोर (मंचर ता. आंबेगाव) पन्नास फूट उंचीचे लिंबाचे झाड प्रथम वीज वाहिन्यावर व त्यानंतर उभ्या असलेल्या चारचाकी असलेल्या तीन वाहनावर कोसळले. सुदैवाने वाहनात कोणीच नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. रविवारी (ता.२६) दुपारी ही घटना घडली.

पाऊस व गारपीट सुरू झाल्यानंतर प्रवास करणारे अनेक जण वाहन झाडाच्या आडोशाला उभे करतात. तसेच पायी ये-जा करणारे नागरिक झाडाखालीच थांबतात. पण सुदैवाने येथे कोणीही नव्हते.

अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे . विजय निकम यांच्यासह पाच प्राध्यापक, पारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी निलेश जाधव,मंचर येथील कल्पेश आप्पा बाणखेले यांचे मित्रपरिवार ढाब्यावर जेवत होते.

त्यावेळी मोठा आवाज झाल्याने सर्वजण बाहेर आले. विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अडकलेली वाहने बाहेर काढण्यासाठी कल्पेश बाणखेले, निकम व ढाब्याचे मालक विलास थोरात (मायकल)यांनी मदत केली महावितरण कंपनीचे जनमित्र व मोरडे कंपनीचे अधिकारी कर्मचारीतेथे आले.

त्यांचीही मदत मिळाली. निकम, जाधव थोरात यांच्या मालकीच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. मंचर पोलीस ठाण्याच्या हवलदार नंदकुमार आढारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे अंदाजे एकूण दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

“आमचे जेवण झाले होते. गाडीत बसून मंचरला निघण्याची तयारी सुरू होती. तेवढ्यात झाड आमच्या गाडीवर कोसळले. आमचे नशीब बलवत्तर. त्यामुळेच आम्ही गाडीत बसण्यासाठी गेलो नाही.”

- विजय निकम अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com