Pune Rain Update : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासल्यात 50 मिलिमीटर पाऊस

खडकवासला धरण परिसरातील काही गावांमध्ये तसेच खेडशिवापूर परिसरात देखील पाऊस पडला
खडकवासला
खडकवासला

खडकवासला : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, पानशेत व टेमघर धरण परिसरात मान्सून पूर्व पाऊस काही परिसरात पडला आहे. खडकवासला येथे पन्नास मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद जलविज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर झाली आहे. खडकवासला परिसरात संध्याकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास मोठ्या पावसाला सुरुवात झाली विजांचा कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. खडकवासला धरण परिसरातील काही गावांमध्ये तसेच खेडशिवापूर परिसरात देखील पाऊस पडला. त्यानंतर, महामार्गाच्या सेवा रस्त्यावर पाणी साठले होते.

खडकवासला
Nashik News : ‘पसा’ नूतनीकरणाला मिळेना प्रायोजक 3 कोटी खर्च अपेक्षित; आराखडा तयार

शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, खडकवासला किरकटवाडी, नांदेड येथेही पावसाच्या सरी सुमारे दीड तासाहून अधिक वेळ कोसळत होत्या. वारजे महामार्गावर आणि सेवा रस्त्यांवर एक दीड फुटापेक्षा जास्त पाणी साठलेले होते.

पाऊस पडल्याचे ठिकाण/ तालुक्याचे नाव/ पाऊस मिलिमीटर मध्ये

येरवडा (हवेली) ११६,

टेमघर (मुळशी) १३,

वरसगाव (वेल्हे) ११,

शिरकोली (वेल्हे) ११,

बऱ्हाणपूर (बारामती) ५५,

लाटे (बारामती)२९,

दासवे लवासा(मुळशी) १०,

घिसर (वेल्हे)१८,

भूतोंडे (भोर)५१

शिरगाव (भोर) ६८,

शिरवली(भोर) ३७

हिरडोशी (भोर) ७६

नीरा देवघर धरण‌४६

आंबेघर (भोर) ५३,

करुंजे (भोर) ८८,

भाटघर(भोर) ५४,

खेंगरेवाडी (पुरंदर) २१

कात्रज (हवेली) ५०

खामगाव (दौंड) १४

मोरगाव (बारामती) २६

वीर धरण ३५

सणसर (इंदापूर) ७८

निमगाव केतकी (इंदापूर) ६३

पळसदेव (इंदापूर) ४०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com