खडकवासला येथे ५० मिलिमीटर पाऊस

खडकवासला येथे ५० मिलिमीटर पाऊस

खडकवासला येथे ५० मिलिमीटर पाऊस
खडकवासला, ता. ८ : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, वरसगाव, पानशेत व टेमघर धरण परिसरात मॉन्सून पूर्व पाऊस काही परिसरात पडला आहे. खडकवासला येथे पन्नास मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जलविज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर झाली आहे.
खडकवासला धरण परिसरातील काही गावांमध्ये तसेच खेडशिवापूर परिसरात देखील पाऊस पडला. शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे, खडकवासला किरकटवाडी, नांदेड येथेही पावसाच्या सरी सुमारे दीड तासाहून अधिक वेळ कोसळत होत्या.
वारजे महामार्गावर आणि सेवा रस्त्यांवर एक ते दीड फुटापेक्षा जास्त पाणी साठलेले होते
पाऊस पडल्याचे ठिकाण/ तालुक्याचे नाव/ पाऊस मिलिमीटर मध्ये

येरवडा (हवेली) ११६,
टेमघर (मुळशी) १३,
वरसगाव (वेल्हे) ११,
शिरकोली (वेल्हे) ११,
बऱ्हाणपूर (बारामती) ५५,
लाटे (बारामती)२९,
दासवे लवासा(मुळशी) १०,
घिसर (वेल्हे)१८,
भूतोंडे (भोर)५१
शिरगाव (भोर) ६८,
शिरवली(भोर) ३७
हिरडोशी (भोर) ७६
नीरा देवघर धरण‌४६
आंबेघर (भोर) ५३,
करुंजे (भोर) ८८,
भाटघर(भोर) ५४,
खेंगरेवाडी (पुरंदर) २१
कात्रज (हवेली) ५०
खामगाव (दौंड) १४
मोरगाव (बारामती) २६
वीर धरण ३५
सणसर (इंदापूर) ७८
निमगाव केतकी (इंदापूर) ६३
पळसदेव (इंदापूर) ४०
==================

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com