मोरगाव - बारामती तालुक्यातील ५०० पेक्षा अधिक सिमेंट बंधारे मे महिन्यात झालेल्या पावसामुळे तुडुंब भरले आहेत. त्यामुळे ओढ्याच्या दोन्ही बाजूच्या अर्धा किलोमीटर अंतरावरील विहिरींतील पाण्याची पातळी वाढली आहे. शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.