esakal | पुणे : पुनर्परीक्षेसाठी बसले ५० हजार विद्यार्थी
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

पुणे : पुनर्परीक्षेसाठी बसले ५० हजार विद्यार्थी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित पुनर्परीक्षेसाठी तब्बल ५० हजार विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यांची परीक्षाही आता अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्याचा निकालही जाहीर करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.

ऑनलाइन परीक्षेच्या वेळी तांत्रिक अडचण किंवा इतर आपत्कालीन अडचणींमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही पुनर्परीक्षा घेण्यात आली. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांतील सर्व सत्रांच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे. आतापर्यंत बी.एड., एम.एड., एम.सी.ए.स आणि एम.बी.ए. असे निवडक अभ्यासक्रम सोडता बहुतेक सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाइन परीक्षा पूर्ण झाली आहे.

हेही वाचा: मला माजी मंत्री म्हणू नका, 3 दिवसांत कळेल - चंद्रकांत पाटील

पुनर्परीक्षेसाठीची पात्रता -

- विद्यापीठाने नऊ प्रकारच्या तक्रारींत विभागणी केली आहे

- चुकीची प्रश्नपत्रिका येणे, अचानक वीज पुरवठा खंडित होणे

- प्रश्नाचे पर्याय किंवा प्रश्नच न दिसणे

- तांत्रिक आणि गंभीर तक्रारींच्या आधारे निवड

- परीक्षा विभाग स्वतः या तक्रारी पडताळून खात्री करून घेते

पुनर्परीक्षा आकडेवारीत...

- परीक्षा सुरवात - ३१ ऑगस्ट ते २४ सप्टेंबर

- सहभागी विद्यार्थी - ५० हजार

- विषयांची संख्या - २६००

विद्यार्थ्यांच्या तक्रारीतील तथ्य पडताळूनच पुनर्परीक्षा घेण्यात आली आहे. आजवर २७६ अभ्यासक्रमांपैकी जवळपास २६० पेक्षा अधिक अभ्यासक्रमांची परीक्षा सुरळीत पार पडल्या असून, त्यांचा निकालही अंतिम टप्यात आहे. लवकरच तो जाहीर करण्यात येईल.

- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

loading image
go to top