Indapur Crime : तरंगवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून लोखंडी रॉडने वार करून 54 वर्षीय व्यक्तीचा खून; दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

अनैतिक संबंधांच्या संशयातून 54 वर्षीय व्यक्तीचा लोखंडी रॉडने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.
Chagan Bhise

Chagan Bhise

sakal

Updated on

इंदापूर - इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून 54 वर्षीय व्यक्तीचा लोखंडी रॉडने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवार (ता.20) दुपारी घडली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून छगन पांडुरंग भिसे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर धुळदेव उर्फ देवा तुकाराम माने (रा. खुळेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि अशोक भानुदास टकले (रा. तरंगवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com