

Dilip Walse Patil reviews loan waiver progress in Ambegaon, calls for faster upload of remaining accounts.
esakal
-डी. के. वळसे पाटील
मंचर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आंबेगाव तालुक्यात १८ शाखांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी संकट निवारण योजना २०२६ अंतर्गत ५हजार ७४९ थकीत खात्यांपैकी ५ हजार ५८१ खाती पोर्टलवर अपलोड झाली असून १६८ खाती प्रलंबित आहेत. प्रलंबित खाती तातडीने अपलोड करा. "अशा सूचना राज्याचे माजी सहकार मंत्री तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जेष्ठ संचालक दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या.