esakal | पुणे : 'या' चार राज्यांतील मजूरांसाठी मंगळवारी रेल्वे सोडणार; वाचा सविस्तर!
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-Migration

18 मे रोजी दिल्लीवरुन एक रेल्वे आली असून, त्यामध्ये एकूण 324 विद्यार्थी प्रवासी होते.

पुणे : 'या' चार राज्यांतील मजूरांसाठी मंगळवारी रेल्वे सोडणार; वाचा सविस्तर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून उत्तरप्रदेश, जम्मू-काश्मिर, बिहार आणि छत्तीसगड या राज्यांसाठी मंगळवारी (ता.19) प्रत्येकी एक रेल्वे सोडण्यात येणार आहे. या रेल्वेने 5628 स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे विभागातून  उत्तरप्रदेशसाठी 1, जम्मू आणि काश्मिरसाठी 1 बिहारसाठी  2 तसेच छत्तीसगडसाठी 1 अशा एकूण पाच रेल्वेगाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये एकूण 7084 प्रवाशी अपेक्षित आहेत.

कोल्हापूर रेल्वे स्थानकावरुन बिहारसाठी 1456 प्रवाशांसह एक रेल्वेगाडी नियोजित आहे. जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

- Big Breaking : दहावी-बारावीच्या परीक्षा होणार जुलैमध्ये; वेळापत्रक जाहीर!

पुणे विभागातून 78 हजार प्रवासी रवाना 
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान, बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड राज्यांमधील 78019 मजुरांना घेऊन पुणे विभागातून आजअखेर 60 विशेष रेल्वेगाड्या रवाना झाल्या आहेत.

- शिवसृष्टीच्या नियोजित जागेत टाकला जातोय राडारोडा

पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 16, उत्तरप्रदेश 27, उत्तराखंड 1, तामिळनाडू 2, राजस्थान 5, बिहार 6,  हिमाचल प्रदेश, झारखंड आणि छत्तीसगडसाठी प्रत्येकी एक अशा एकूण 60 रेल्वेगाडया रवाना झाल्या आहेत. 18 मे रोजी दिल्लीवरुन एक रेल्वे आली असून, त्यामध्ये एकूण 324 विद्यार्थी प्रवासी होते. त्यात पुणे 111, सांगली 31, सातारा 38, सोलापूर 54 आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 45 विद्यार्थ्यांचा समावेश होता.

- पुणे : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षेचे फॉर्म भरण्यास झाली सुरवात!

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा