
पूर्वी इयत्ता चौथी आणि सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होत असे. परंतु बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा 2009 ची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून ही परीक्षा चौथीच्याऐवजी पाचवी आणि सातवीच्याऐवजी आठवीच्या वर्गासाठी घेण्यात येत आहे.
पुणे : जिल्हा परिषद शाळांमधील 574 विद्यार्थी इयत्ता पाचवीच्या तर, 58 विद्यार्थी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकले आहेत. हे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत पाचवीचे 29 तर आठवीचे 22 विद्यार्थी वाढले आहेत. पाचवीचे सर्वाधिक 277 विद्यार्थी शिरूर तालुक्यातील आहेत.
काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
पूर्वी इयत्ता चौथी आणि सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होत असे. परंतु बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा 2009 ची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून ही परीक्षा चौथीच्याऐवजी पाचवी आणि सातवीच्याऐवजी आठवीच्या वर्गासाठी घेण्यात येत आहे. इयत्ता आठवीचे वर्ग असलेल्या जिल्हा परिषद शाळांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे या वर्गातील कमी विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसत असतात, असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती रणजित शिवतरे यांनी सांगितले.
गेल्या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीचे 545 तर, आठवीचे 36 विद्यार्थी पात्र ठरले होते. यंदा हाच आकडा अनुक्रमे 574 आणि 58 झाला आहे. दरम्यान, यंदाच्या आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत बारामती, भोर, हवेली, इंदापूर, जुन्नर आणि पुरंदर या सहा तालुक्यांतील एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकला नाही. आठवीत सर्वाधिक 20 विद्यार्थी शिरूर तालुक्यातील पात्र ठरले आहेत. याशिवाय खेड व मुळशी तालुक्यातील प्रत्येकी 14 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. मावळमधील पाच, आंबेगाव आणि वेल्हे प्रत्येकी दोन तर, दौंड तालुक्यातील एक विद्यार्थी गुणवत्तायादीत आला आहे.
काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
पाचवीचे तालुकानिहाय गुणवंत संख्या -
शिरूर -277, खेड -136, आंबेगाव-69, हवेली -23, बारामती -4, भोर -10, दौंड-9, इंदापूर -5, जुन्नर-17, मावळ -3, मुळशी -9, पुरंदर -11 आणि वेल्हे -1.
सातारा-पुणे महामार्गावर विचित्र अपघात; 8 वाहने एकमेकांना धडकली