Investment FraudSakal
पुणे
Pune Scam : पुण्यात पोलीसासह दोघांची ५८ लाखांची गुंतवणूक फसवणूक
Investment Fraud : शेअर बाजारात हमखास परतावा देण्याचे आमिष दाखवून एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांची ५८ लाखांची फसवणूक करण्यात आली असून, हडपसर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीवर हमखास परतावा देण्याचे आमिष दाखवून एका पोलिस कर्मचाऱ्यासह दोघांची ५८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात भारती शेअर मार्केटच्या संचालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.