

Air Quality Concerns Trigger Closure of RMC Projects in Pune, Pimpri
sakal
पुणे : वाढते शहरीकरण, ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामे, मेट्रोचे काम आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची हवा अत्यंत वेगाने प्रदूषित होत आहे. या गंभीर प्रश्नावर ‘सकाळ’ने ‘गुदमरतोय श्वास’ या वृत्तमालिकेतून सविस्तर प्रकाश टाकत प्रशासनाला जागे केले होते. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) हवेची गुणवत्ता बिघडविणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन्ही शहरांतील तब्बल ५९ ‘रेडीमिक्स कॉंक्रीट’ (आरएमसी) आणि स्टोन क्रशर प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले आहेत.