esakal | बारामतीतील सहा जणांचे कोरोना रिपोर्ट असे आले... 
sakal

बोलून बातमी शोधा

corona nigative.JPG

तांदूळवाडी येथे पुण्याहून आलेल्या एका रुग्णाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्या नंतर संबंधितांच्या संपर्कात आलेल्या सहा जणांच्या घशातील द्रावाचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

बारामतीतील सहा जणांचे कोरोना रिपोर्ट असे आले... 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती  (पुणे) : शहरानजीक तांदूळवाडी येथे कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील सहाही जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

युवतीला विमान चालविण्याचे प्रशिक्षण देताना 'त्याने' केले हे कृत्य; अन् मग...

तांदूळवाडी येथे पुण्याहून आलेल्या एका रुग्णाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्या नंतर संबंधितांच्या संपर्कात आलेल्या सहा जणांच्या घशातील द्रावाचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मुंबई व पुण्याहून येणारे नागरिक ही बारामती तालुक्‍यासाठीही डोकेदुखी बनली आहे. तेरापैकी चार जण मुंबई व पुण्याहून आलेले होते, त्यामुळे बाहेरगावाहून येणा-यांची तपासणी करणे गरजेचे असल्याचे प्रशासनाचे मत आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

कुटुंबीयांनीही परगाव किंवा परराज्यातून कोणीही नातेवाईक आल्यास त्याची माहिती तातडीने प्रशासनाला द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. जून महिना सुरू होताना अनेक जण घरी परततील त्यांची माहिती देणे व त्यांची तपासणी करून घेणेही गरजेचे असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.