युवतीला विमान चालविण्याचे प्रशिक्षण देताना 'त्याने' केले हे कृत्य; अन् मग...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

कार्व्हर एव्हीएशन या विमान प्रशिक्षण देणा-या कंपनीतील विवेक आगरवाल या चीफ पायलटविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती (पुणे) : येथील कार्व्हर एव्हीएशन या विमान प्रशिक्षण देणा-या कंपनीतील विवेक आगरवाल या चीफ पायलटविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती तालुका पोलिसात हा गुन्हा दाखल झाला आहे. ज्या युवतीने या संदर्भात तक्रार दिली होती, तिला तब्बल दोन महिने हा गुन्हा दाखल करण्यासाठी संघर्ष करावा लागला होता.

 पुण्यातील पोलिसांनी घडविले `असे` माणुसकीचे दर्शन...

या संदर्भात 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान सदर युवती विमान चालविण्याचे प्रशिक्षण घेताना विमानात तिच्यासोबत त्याने वेळोवेळी लज्जास्पद वर्तन केले. तिचा हात पकडून व स्पर्श करुन तिला त्रास दिला. या संदर्भात संबंधित प्रशिक्षण घेणाऱ्या युवतीने तातडीने पालकांशी संपर्क साधून पोलिस ठाणे गाठले.

खासदारपदाच्या हॅटट्रिकच्या वर्षपूर्तीनिमित्त सुप्रिया सुळे यांनी केलाय `हा` संकल्प

पोलिसात तक्रार दिल्यानंतर दौंडच्या उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्याकडे पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता तालुका पोलिसात या बाबत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या संदर्भात कार्व्हर एव्हीएशनने अंतर्गत चौकशी सुरु केली असून ही चौकशी अद्याप प्रलंबित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief pilot charged with molestation in Baramati