बारामतीत 60 हजार आर्सेनिक गोळ्यांच्या डब्यांचे होणार वाटप

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

- बारामतीत 60 हजार आर्सेनिक गोळ्यांच्या डब्यांचे होणार वाटप

बारामती : सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मुंबईस्थित आशिष पोतदार यांनी बारामतीकरांसाठी आर्सेनिक 30 या होमिओपॅथिक गोळ्यांच्या 60 हजार डब्या बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केल्या. रोगप्रतिकारशक्ती अधिक वाढावी यासाठी या गोळ्यांचा सध्या वापर केला जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बारामतीतील एक लाख कुटुंबाना या गोळ्या देण्याचा आशिष पोतदार यांचा प्रयत्न आहे. सुनेत्रा पवार यांनी या गोळ्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्याकडे सुपूर्द केल्या. आरोग्य विभाग या गोळ्यांचे वाटप करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र पाठवून या गोळ्यांच्या एक लाख डब्या देण्याचा मनोदय आशिष पोतदार यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 60 हजार डब्या देण्यात आल्या असून, उर्वरित 40 हजार डब्याही टप्याटप्याने पोहोचविण्यात येणार आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आशिष पोतदार यांनी राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे, कोरोनावर मात करण्यासाठी अनेकजण उत्स्फूर्तपणे पुढे येत आहेत, सर्वांनीच त्यांचे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

डॉ. भगवान पवार यांनीही या गोळ्यांचा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी उपयोग होईल, असे यावेळी नमूद केले. पोतदार यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 60000 boxes of arsenic pills will be distributed in Baramati