

Lakhs of Litres of Water Lost After Pipeline Bursts on Katraj-Kondhwa Road
esakal
कात्रज: कात्रज-कोंढवा मुख्य रस्त्यावरील गोकुळनगर चौकात, एसबीआय बँकेसमोर महापालिकेची ६०० मिमी व्यासाची पाणीपुरवठा वाहिनी फुटल्याने लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत असून वाहनचालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागला.