६५ वर्षांच्या तरुणाने गेल्या १० महिन्यांत तब्बल १५ वेळा केले प्लाझ्मादान

प्लाझ्मादानाचा हा आदर्श घालून देणारे हे आजोबा आहेत रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड. बांगड हे गेली अनेक वर्षे ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदानाच्या मोहिमेत कार्यरत आहेत.
Ram Bangad
Ram BangadSakal

पुणे - कोरोनातून (Corona) बरे झालेले तरुण (Youth) प्लाझ्मादान (Plasma Donate) करण्यासाठी धजावत नाहीत. मात्र, ६५ वर्षांच्या तरुणाने गेल्या १० महिन्यांत तब्बल १५ वेळा प्लाझ्मादान करून अनेक रुग्णांचे (Patient) प्राण वाचविले (Life Saving) आहेत. तरुणांनी भीती सोडावी आणि रुग्णांना जीवदान देण्यासाठी समोर येऊन प्लाझ्मादान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. (65 year old has undergone plasma donation 15 times in the last 10 months)

प्लाझ्मादानाचा हा आदर्श घालून देणारे हे आजोबा आहेत रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड. बांगड हे गेली अनेक वर्षे ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदानाच्या मोहिमेत कार्यरत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत शेकडो रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहेच, पण त्यांनी स्वतः १३३ वेळा रक्तदान केले आहे, तर २१ वेळा प्लेटलेट्स दिल्या असल्याने डेंगीची लागण झालेल्या अनेकांचे प्राण वाचले आहेत.

Ram Bangad
पुणे पोलिसांनी पूर्ण केली डॉक्टर दाम्पत्याची 'ती' इच्छा...

बांगड यांना जून महिन्यात कोरोनाची लागण झाली. कोरोनातून ठणठणीत बरे झाल्यानंतर २८ दिवसांनी प्लाझ्मादान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून प्लाझ्मा घेण्याचे ठरविले. तेव्हापासून बांगड दर १५ दिवसांनी एकदा प्लाझ्मादान करतात. त्यांनी पंधरावे प्लाझ्मादान १३ मे रोजी केले आहे.

कोरोनावरील रुग्णांवर प्रभावी उपचार म्हणून प्लाझ्मा थेरपीला महत्त्व आले आहे; पण प्लाझ्मादान करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना प्लाझ्मा मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. पुण्यामध्ये प्लाझ्मा मिळाला नाही तर तो शेजारच्या जिल्ह्यांमधून आणावा लागत आहे. पुण्यामध्ये आजपर्यंत ४ लाख पेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यातील वयोवृद्ध नागरिक, महिला व इतर आजार असलेले रुग्ण सोडता मोठ्या प्रमाणात प्लाझ्मादान करू शकणारे नागरिक आहेत. पण त्यांच्यामध्ये प्लाझादानाबद्दल असलेले गैरसमज आणि भीती यामुळे ते दान करत नसल्याने गरजू रुग्णांचे हाल होत आहेत.

बांगड म्हणाले, ‘‘६० वर्षापर्यंतचे नागरिक प्लाझ्मादान करू शकतात; पण माझी प्रकृती उत्तम असल्याने व कोणताही त्रास नसल्याने ६५ व्या वर्षांत १५ वेळा प्लाझ्मादान करू शकलो आहे. माझ्यासारखा ज्येष्ठ नागरिक प्लाझ्मा देऊ शकतो, तर तरुणांना काय हरकत आहे. प्लाझ्मादानाने कोणताही त्रास होत नाही, त्यामुळे घाबरून जाऊ नका. एकदा प्लाझ्मा दिला की त्यातून तीन जणांचा जीव वाचतो.’

याकडे लक्ष द्या...

  • कोरोनातून बरे झाल्यानंतर २८ दिवसांनी प्लाझ्मादान करता येते

  • थायराइड, मधुमेह, रक्तदाब असलेल्या व्यक्तीही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लाझ्मा देऊ शकतात

  • प्लाझ्मादानाने कोणताही त्रास होत नाही

  • दर ७ ते १५ दिवसांनी एकदा प्लाझ्मादान करता येते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com