Pune Traffic : खडकवासला येथील ६५ वर्षे जुना मुठा नदीवरील पूल तांत्रिक तपासणी आणि स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये 'अतिधोकादायक' आढळल्याने, पुणे महापालिकेने तो जड वाहनांसाठी पूर्णपणे बंद केला आहे, मात्र हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू राहील.
खडकवासला : खडकवासला धरणाजवळील मुठा नदीवरील ६५ वर्षे जुना पूल धोकादायक ठरल्यामुळे महापालिकेने तो जड व उंच वाहनांसाठी बंद केला आहे. मोटार आणि दुचाकी या हलक्या वाहनांसाठी पूल खुला असेल.