esakal | पुणे शहरात आज ६६ ठिकाणी लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

पुणे शहरात आज ६६ ठिकाणी लसीकरण

sakal_logo
By
प्रशांत पाटील

पुणे - महापालिकेकडे शिल्लक असलेल्या लसीच्या (Vaccine) साठ्याचे ६६ केंद्रांवर वाटप करण्यात आले आहे. बुधवारी (ता. १४) ६० ठिकाणी कोव्हीशील्ड (Covishield) आणि ६ ठिकाणी कोव्हॅक्सीनचे (Covaxin) लसीकरण होणार आहे. या केंद्रांवर १८ वयाच्या पुढील सर्वांना लस उपलब्ध होईल. (66 Places Corona Vaccination in Pune City)

कोव्हीशील्ड

- पहिल्या डोससाठी ४० टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे

- पहिल्या डोससाठी २० टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध

- पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (२० एप्रिल) घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस ऑनलाइन

- थेट केंद्रावर येणाऱ्यांसाठी २० टक्के लस दुसऱ्या डोससाठी

हेही वाचा: राज्यात नव्या पाच कारागृहांचा प्रस्ताव; शिकागोच्या धर्तीवर होणार बांधणी

कोव्हॅक्सीन

- ६ केंद्रांवर प्रत्येकी २०० डोस

- पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी २० टक्के लस

- पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस

- १५ जून पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्याच्या दुसऱ्या डोससाठी ४० टक्के लस ऑनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

- दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस उपलब्ध

loading image