esakal | निवृत्त न्यायाधीशांनी हरवले कोरोनाला अन् ६८ व्या वर्षी जिंकली 'जगण्याची केस'!
sakal

बोलून बातमी शोधा

Judge-Corona

न्यायाधीश खान यांची पत्नी नफीसा खान यांना 11 मे रोजी कोरोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले होते.

निवृत्त न्यायाधीशांनी हरवले कोरोनाला अन् ६८ व्या वर्षी जिंकली 'जगण्याची केस'!

sakal_logo
By
सनील गाडेकर

पुणे : विविध आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकास कोरोनाची लागण झाली, तर त्याची बचावण्याची शक्यता कमी असते. या शक्यतेवर मोठ्या हिमतीने मात करत ६८ वर्षीय निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी (ता.२८) त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

- कामगारांचे स्थलांतर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे आदेश; 'हे' आहेत महत्त्वाचे ५ मुद्दे!

डॉ. आर. एम. खान असे या निवृत्त न्यायाधीशांचे नाव आहे. 2010 साली ते निवृत्त झाले असून कुटुंबासह पुण्यातच राहत आहेत. सर्दी आणि खोकला झाल्याने त्यांची 18 मेला कोरोनाची टेस्ट करण्यात आली होती. त्यातून त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांनो, 15 जुनला शाळेचा पहिला दिवस पण...

या काळात त्यांनी डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करत योग्य आणि सकस आहार घेतला. गेली 28 वर्षे मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असताना देखील त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. त्यामुळे विविध आजार आणि ज्येष्ठ नागरिक कोरोनापासून बचावत नाहीत, या घटनेला ते अपवाद ठरले आहे. ते ठणठणीत बरे होऊन घरी आल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

अय्या खरंच, तुळशीबाग सुरू होत आहे...

पत्नीने देखील कोरोनाला हरवले :
न्यायाधीश खान यांची पत्नी नफीसा खान यांना 11 मे रोजी कोरोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले होते. 58 वर्षाच्या नफिसा यांनी देखील कोरोनाशी दोन हात करून त्याला हरवले. पत्नीला कोरोना झाल्याने खान यांची तपासणी करण्यात आली होती. खान जोडप्याने अगदी तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने कोरोनाचा लढा लढला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना असल्याचे समजल्यानंतर घाबरून जाऊ नका. घाबरून किंवा काळजी करून कोणताही आजार बरा होत नाही. या रोगापासून बरे होण्यासाठी शासनाने जारी केलेल्या आदेशांचे पालन ​​करावे. सामाजिक अंतर, मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित उपयोग करावा. कोरोनाबाधित बरा व्हावा यासाठी डॉक्टरदेखील अगदी कसोशीने प्रयत्न करीत असतात.
- डॉ. आर. एम. खान, निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश

loading image