कामगारांचे स्थलांतर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे आदेश; 'हे' आहेत महत्त्वाचे ५ मुद्दे!

Migration_workers
Migration_workers

नवी दिल्ली : जागतिक महामारी कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आले. त्यामुळे अनेक मजूर, कामगार, विद्यार्थी आणि लाखो नागरिक वेगवेगळ्या शहरात अडकून पडले होते.

राहण्याची-खाण्याची व्यवस्था अपुरी पडू लागल्याने तसेच कोरोनाची भीती वाढू लागल्याने अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला. आणि काही दिवसांत अनेक नागरिक आपापल्या गावी पोहोचले. 

गेल्या काही दिवसांपासून अडकून पडलेल्या विद्यार्थी, मजूर आणि कामगारांना बस, रेल्वेच्या माध्यमातून आपापल्या राज्यात आणण्याचे प्रयत्न राज्य सरकारांनी सुरू केले आहे. मात्र, अजूनही अनेकजण वेगवेगळ्या शहरात अडकून पडले आहेत. या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टाने लक्ष्य घातले असून परप्रांतीय कामगारांच्या वाहतुकीसाठी अंतरिम आदेश काढले आहेत. 

केंद्र सरकारने १ मे पासून विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो वादाचा विषय ठरला होता. कडक उन्हात अन्न आणि पाणी न मिळाल्याने अनेक प्रवाशांचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला. उपासमारीमुळे आलेली निराशा हताश झालेल्या स्थलांतरीतांना रोखू शकली नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील सामान आणि साहित्य लुटल्याच्या घटनाही अनेक ठिकाणी घडल्या.  

दरम्यान कालच आपल्या मृत आईला उठविण्यासाठी धडपड करणाऱ्या एका लहान मुलाचा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची दखल घेत सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारांना जबाब नोंदविण्यास सांगितले. स्थलांतरितांची वाहतूक आणि भोजन पुरविणे ही सध्याची मुख्य समस्या असून त्याकडे लक्ष्य देण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. 

आज जारी केलेल्या आदेशातील महत्त्वाचे ५ मुद्दे: 

१. जेव्हा राज्य सरकार गाड्यांची विनंती करेल, तेव्हा रेल्वे आणि परिवहन विभागाने गाड्यांचा पुरवठा करावा. तसेच प्रवासी कामगारांकडून रेल्वे आणि बसचे भाडे आकारू नये. हे भाडे राज्य सरकारकडून घेतले जावे. 

२. अडचणीत सापडलेल्या स्थलांतरित कामगारांना संबंधित राज्यांमार्फत अधिसूचित केलेल्या जागेवर भोजन पुरविण्यात येईल.

३. रेल्वे प्रवासादरम्यान राज्य सरकारतर्फे प्रवाशांना जेवण आणि पाणी पुरवठा केला जाईल. बसमधून प्रवास करणाऱ्यांनाही जेवण आणि पाणी पुरविले जाईल.

४. स्थलांतरित कामगारांच्या नोंदणीचे काम राज्य सरकार पार पाडेल. आणि नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगार ठराविक तारखेनुसार रेल्वे किंवा बसमधून प्रवास करतील.

५. तसेच जे प्रवासी कामगार अजूनही रस्त्यावर फिरताना आढळले, तर त्यांना तातडीने आश्रय द्यावा आणि त्यांना भोजन आणि इतर सुविधा पुरवाव्यात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com