

Power Connectivity Fund to Accelerate Jal Jeevan Mission in 11 Ambegaon Villages
esakal
-डी. के. वळसे पाटील
मंचर : आंबेगाव तालुक्यातील जलजीवन मिशनअंतर्गत पूर्ण झालेल्या ११ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना वीज जोडणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने बंद अवस्थेत होत्या. परिणामी संबंधित गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. मात्र, पुणे जिल्हा नियोजन मंडळाने या योजनांच्या वीज जोडणीसाठी तब्बल ₹७२ लाख ८३ हजार ३३७ इतका निधी मंजूर केल्याने या योजनांना मोठा दिलासा मिळाला आहे.