esakal | पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळले ७४५ कोरोना रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळले ७४५ कोरोना रुग्ण

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळले ७४५ कोरोना रुग्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना नियंत्रणात येत असला, तरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीत अद्यापही फारशी सुधारणा झालेली दिसत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून ग्रामीण भागात सातत्याने दररोज पाचशेहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात बुधवारी ७४५ नवे कोरोना आढळून आले.

दरम्यान, ग्रामीण भागातील कोरोना स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आता तालुकास्तरीय कोरोना आढावा बैठका घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा: पुणे विभागात आतापर्यंत १७ लाख कोरोनामुक्त

जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ४ हजार ४५८ सक्रिय (ॲक्टिव्ह) कोरोना रुग्ण आहेत. त्यापैकी २ हजार ६७० रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. उर्वरित १ हजार ७८८ जण गृहविलगीकरणात आहेत.

शहर व ग्रामीणसह जिल्ह्यात एकूण ९ हजार ३०८ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी ५ हजार ८२ रुग्णांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरू असून उर्वरित ४ हजार २२६ रुग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६० लाख ९ हजार ३८२ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. एकूण चाचण्यांमध्ये ग्रामीण भागातील १३ लाख २३ हजार ९३८ चाचण्यांचा समावेश आहे.

हेही वाचा: गोळीबाराचा बदला घेण्यासाठी खूनाची सुपारी; माजी नगरसेवकास अटक

जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने कोरोना रुग्णांच्या स्थितीचा रोज आढावा घेऊन, त्याबाबतचा क्षेत्रनिहाय अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालात पुणे व पिंपरी चिंचवड पालिका, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र, नगरपालिका क्षेत्र आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात आढळून येणारे नवे कोरोना रुग्ण, कोरोनामुक्त रुग्ण, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आणि घेण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्या आदींची माहिती दिली जाते.

पुणे जिल्ह्यातील बुधवारची कोरोना रुग्ण संख्या

- पुणे शहर --- ३४६

- पिंपरी चिंचवड --- २१६

- जिल्हा परिषद कार्यक्षेत्र --- ७४५

- नगरपालिका क्षेत्र --- ११२

- कॅंटोन्मेंट बोर्ड --- १२

- पुणे जिल्हा एकूण --- १४३१

- आजचे एकूण कोरोनामुक्त --- १३५९

- आजचे मृत्यू --- १०

loading image