पुणे  जिल्ह्यात दिवसभरात 745 नवे कोरोना रुग्ण 

पुणे  जिल्ह्यात दिवसभरात 745 नवे कोरोना रुग्ण 

पुणे - पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.20) दिवसभरात 745 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील 328 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत एकूण 6 हजार 77 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, आज 1 हजार 895 कोरोनामुक्त झाले असून 36 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज पिंपरी चिंचवडमध्ये 193, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 166, नगरपालिका क्षेत्रात 47 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 11 नवे रुग्ण सापडले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 21 जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील 7 आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.

नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही काल (ता.19) रात्री 9 वाजल्यापासून आज (ता.20) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील आज अखेरपर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 15 हजार 756 झाली आहे. यापैकी 2 लाख 90 हजार 823 कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 7 हजार 524 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 324 जणांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com