esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

pune

जर्मनीतील भारतीय दूतावास जोडणार ७५ शाळा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग जर्मनीत राहणाऱ्या मराठमोळ्या डॉ. सुयश यशवंतराव चव्हाण यांच्याद्वारे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ७५ शाळा जोडण्याचा व मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ‘जागतिक विद्यार्थी दिना’निमित्त १८ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे.

जर्मनीतील म्युनिच येथील भारतीय वाणिज्य दूतावासाद्वारे १८ रोजी दुपारी अडीच वाजता यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आयोजित केली जाणार आहे. जर्मनीमध्ये कार्यरत भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) अधिकारी डॉ. चव्हाण यांची ही संकल्पना आहे. यासाठी महाराष्ट्रातील दुर्गम व ग्रामीण भागांतील शासकीय शाळांना यासाठी प्राधान्य दिले जाणार असून, राज्यभरात विद्यार्थी व शिक्षकांचा एक गट तयार केला जात आहे.

यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ सहकार्य करणार आहे. विद्यार्थ्यांना जागतिक संधी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यास तयार करणे, जर्मनीमध्ये असलेल्या शैक्षणिक आणि करिअर संधींबद्दल जागरूक करणे, करिअरसाठी आवश्‍यक मार्गदर्शन, अनुभव, माहिती या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना देणे, जर्मन भाषा आणि संस्कृती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा याचा उद्देश आहे.

नावनोंदणी सुरू

उपक्रमात प्राथमिक शाळा पहिली ते सातवी व माध्यमिक शाळा आठवी ते दहावी असे दोन गट असतील. यासाठी शाळांची नावनोंदणी सुरू झाली आहे. शाळांनी ५ ऑक्टोबरपूर्वी पुढील मेलवर माहिती पाठवावी. मेलमध्ये शाळेचे पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, सहभागी शिक्षकाचे नाव, मोबाईल क्र. व इ-मेल आयडी हा तपशील द्यावा, असे कळविण्यात आले आहे.

नोंदणीसाठी मेल आयडी - sanjayrchikte@gmail.com,

anil.handepune@gmail.com

उपक्रमात प्राथमिक शाळा पहिली ते सातवी व माध्यमिक शाळा आठवी ते दहावी असे दोन गट असतील. यासाठी शाळांची नावनोंदणी सुरू झाली आहे. शाळांनी ५ ऑक्टोबरपूर्वी पुढील मेलवर माहिती पाठवावी. मेलमध्ये शाळेचे पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, सहभागी शिक्षकाचे नाव, मोबाईल क्र. व इ-मेल आयडी हा तपशील द्यावा, असे कळविण्यात आले आहे. नोंदणीसाठी मेल आयडी - sanjayrchikte@gmail.com,

anil.handepune@gmail.com

अधिक माहितीसाठी संपर्क : ८८०५४५९००९ , ९९२२४१९१५०

loading image
go to top