Pune News : विद्यापीठाचा ७६ कोटींच्या तूटीचा अर्थसंकल्प सादर

नव्या अधिसभेच्या पहिल्याच बैठकीला शनिवारी सूरवात
76 crore deficit budget of university presented first meeting of new Adhisabha
76 crore deficit budget of university presented first meeting of new AdhisabhaGoogle

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा ६०१ कोटी खर्चाचा आणि ७६ कोटी ७५ लाख रूपयांच्या तूटीचा अर्थसंकल्प शनिवारी (ता.११) अधिसभेत सादर करण्यात आला. शैक्षणिक नवोपक्र, संशोधन प्रकल्प आणि नव्या विकासकामांसाठी यंदाचा अर्थसंकल्पात विशेष स्थान पाहायला मिळाले.

76 crore deficit budget of university presented first meeting of new Adhisabha
Budget 2023 : कोणाच्या सरकारमध्ये किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; अजित पवारांनी सांगितली आकडेवारी

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी अधिसभेसमोर अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सभेचे अध्यक्ष तथा कुलगुरू डॉ. कारभारी काळे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी उपस्थित होते. डॉ. सोनवणे म्हणाले,‘‘विद्यापीठाची मूलभूत ध्येय धोरणे, आ

गामी काळातील उद्दिष्ट्ये, सामाजिक गरज आणि अर्थसंकल्पात अंतर्भूत असलेली आकडेवारी, याची योग्य सांगड घालत प्राप्त परिस्थितीत विद्यापीठाशी निगजीत घटकांची अपेक्षापूर्तता करणे, हे या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्ये आहे.आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ५२४ कोटी जमेचा आणि ६०१ कोटी रूपयांच्या खर्चाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे.’’

76 crore deficit budget of university presented first meeting of new Adhisabha
Maharashtra Budget: सत्ताधारी म्हणतात ‘पंचामृत’.. विरोधकांच्या मते स्वप्नरंजन!

नवीन तरतूदी

- भारतीय विज्ञान कॉंग्रेस ः दरवर्षी होणाऱ्या या विज्ञानन परिषदेसाठी १०० विद्यार्थ्यांना पाठविणार ः ५ लाख

- भारतीय ज्ञान व्यवस्था अभ्यास केंद्र ः ५ लाख

- तृणधान्य अभ्यास केंद्र ः ५ लाख

- संशोधनासाठी प्राणीगृह (ॲनिमल हाऊस) ः २ कोटी

- विद्यापीठ संगीत भवन ः १ कोटी

महत्त्वाचे निधी

- कमवा व शिका योजना ः ५ कोटी

- समर्थ भारत अभियान ः १ कोटी

- वसतिगृह सुधार आणि बांधणी ः ३१ कोटी ३१ लाख

- खाशाबा जाधव स्पोर्ट कॉम्प्लेक्स ः ४ कोटी

- गुणवत्ता सुधार कार्यक्रम ः १० कोटी

भौतिकशास्राचा अखेर विस्तार

संशोधनामध्ये केवळ विद्यापीठातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर आघाडीवर असलेल्या भौतिकशास्र विभागाच्या विस्तारासाठी अखेर दोन कोटींच्या निधीची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. ५० वर्षांपेक्षा जास्त जूनी इमारत असलेल्या विभागाला आता जागा अपूरी पडत आहे. नवीन प्रयोगशाळा आणि प्रकल्पांना सामाविष्ट करण्यासाठी नव्या ईमारतीची गरज होती. या आधिही यासंबंधीची घोषणा करत पाया खोदण्यापर्यंत आलेले काम थांबविण्यात आले होते.

संशोधन व गुणवत्तेसाठी ५ कोटी

संलग्न महाविद्यालयांतील प्राध्यापकांमध्ये संशोधनात्मक वृत्ती वाढीस लागावी म्हणून संशोधन योजने अंतर्गत ५ कोटींची तरतूद करण्यात आली. संशोधन योजनेसाठी पाच कोटी, शैक्षणिक समन्वय योजनेला १५ लाख, राष्ट्रीय परिषदांसाठी २० लाखांची तरतूद करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com