अन् रात्रीत त्यांनी केले 8 लाख लंपास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

एटीएम मशिन गॅस कटरने कापून त्यातील आठ लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली.

पिंपरी : एटीएम मशिन गॅस कटरने कापून त्यातील आठ लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना सोमवारी (ता.27) सकाळी वाकड येथे उघडकीस आली. या घटनेत एटीएम मशिनला आग लागल्याने मशिनचेही नुकसान झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाकड पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरच असलेल्या दत्त मंदीर रस्त्याला ऍक्‍सिस बॅंकेचे एटीएम सेंटर आहे. अज्ञात चोरट्यांनी येथील मशिन गॅस कटरच्या साहय्याने कापून आठ लाखांची रोकड लंपास केली. सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत. ही घटना रात्री घडली असल्याची शंका पोलिसांना आहे.

पुण्यात सुरु झाले शिवभोजन? पाहा कोठे?

मागील तीन महिन्यांपासून शहरात एटीएम फोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांची गांभीर्याने दखल घेत पोलिस आयुक्तांनी विशेष पथकाची स्थापना केलेली आहे. तरीही एटीएम फोडीच्या घटना कमी झालेल्या नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8 lakh stolen from ATM machine