esakal | ८१ टक्के पालकांचा प्रत्यक्ष शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यास होकार
sakal

बोलून बातमी शोधा

Education

८१ टक्के पालकांचा प्रत्यक्ष शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यास होकार

sakal_logo
By
- मीनाक्षी गुरव

पुणे - कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या वर्गाबरोबरच अन्य इयत्तांमधील वर्ग (Class) सुरू करण्यासाठी ८१ टक्के पालकांनी (Parent) होकार दर्शविला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करून प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना (Student) शाळेत पाठविण्याला जवळपास पाच लाख ६० हजार ८१९ पालकांनी सहमती दिली आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. (81 Percent of Parents Agree to Send Students to Actual School)

कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या वर्गाप्रमाणेच इतर इयत्तांमधील वर्ग सुरू करावेत का, या प्रश्नांचे उत्तर खुद्द पालकांकडून जाणून घेण्यासाठी ‘एससीईआरटी’ने आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने कोरोनामुक्त भागात १५ जुलैपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु हा निर्णय जाहीर झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या तज्ज्ञांनी आणि शैक्षणिक संस्थांकडून इतर वर्गही सुरू करण्याची मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालक आणि शिक्षकांची मते जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले.

हेही वाचा: राज्यात नव्या पाच कारागृहांचा प्रस्ताव; शिकागोच्या धर्तीवर होणार बांधणी

सर्वेक्षणात भागानुसार सहभागी झालेले पालक :

- मते नोंदविलेले एकूण पालक : ६,९०,८२०

- ग्रामीण भाग : ३, ०५,२४८ (४४.१९ टक्के)

- निमशहरी भाग : ७१,९०४ (१०.४१टक्के)

- शहरी भाग : ३,१३,६६८ (४५.४० टक्के)

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करून शाळा सुरू केल्यास पाल्यास शाळेत पाठविण्यास तयार आहात का!, या प्रश्नांवर पालकांनी दिलेले उत्तर :

- पर्याय : टक्केवारी : उत्तर देणाऱ्या पालकांची संख्या :

- होय : ८१.१८ टक्के : ५,६०,८१८

- नाही : १८.८२ टक्के : १,३०,००२

- एकूण :- : ६,९०,८२

जिल्हानिहाय सर्वेक्षणात सहभागी झालेले पालक :

- जिल्हा : पालकांची संख्या

- पुणे : ७३,८३८

- मुंबई (बीएमसी) : ७०,८४२

- नाशिक : ४७,२०२

- सातारा : ४१, २३३

- ठाणे : ३९,२२१

- नगर : ३४,०६७

loading image