esakal | बारामतीत कोरोना वाढत असताना ही मागणी आली पुढे
sakal

बोलून बातमी शोधा

corona1

बारामती शहरात आज नऊ जण कोरोनाबाधित आढळले. संपर्कात येणाऱ्या रुग्णांमुळे इतरही जणांना वेगाने कोरोनाची बाधा होऊ लागली आहे. सर्वांनी काळजी घेण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे प्रशासनाने आज स्पष्ट केले.

बारामतीत कोरोना वाढत असताना ही मागणी आली पुढे

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहरात आज नऊ जण कोरोनाबाधित आढळले. संपर्कात येणाऱ्या रुग्णांमुळे इतरही जणांना वेगाने कोरोनाची बाधा होऊ लागली आहे. सर्वांनी काळजी घेण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे प्रशासनाने आज स्पष्ट केले. आज बारामतीतील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांचा आकडा 221 पर्यंत गेला आहे. दरम्यान, काल रुई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना बर्‍हाणपूर येथील एका जेष्ठ ग्रामस्थाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 16 झाली आहे.  

आळंदीत चोर पावलांनी वशिल्याचे माउली दर्शन

बारामतीत आज कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांमध्ये बारामती शहरातील 5 जण आहेत. त्यात भोई गल्ली येथील 26 वर्षाचा व 28 वर्षाचा युवक, रुई येथील 22 वर्षाची महिला, जळोची येथील 45 वर्षीय महिला व जामदार रोड येथील तीस वर्षाचा पुरुष आहे. तर, तालुक्यातील धुमाळवाडी, शिर्सुफळ, बऱ्हाणपूर येथील रुग्णांचा समावेश आहे. 

या विद्यार्थ्यांसाठी आहे लष्करात संधी

बारामतीत रुग्णांची संख्या वाढते आहे. ही रुग्णसंख्या कमी करण्यासाठी शहरात प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यासह सर्वेक्षणही करण्यात येत आहे. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्षा तरन्नूम सय्यद, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी वेगाने मोहिम हाती घेतली आहे. बारामती तालुक्यातही गटविकास अधिकारी राहुल काळभोर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी जनजागृतीची मोहिम हाती घेतली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, बारामती शहरातील विविध भागात वेगाने येणारे पॉझिटीव्ह रुग्ण विचारात घेता संपूर्ण रस्ता किंवा गल्ली प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर करण्याऐवजी संबंधित इमारत फक्त प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जावे, इतरांच्या व्यवहारावर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये, अशीही मागणी होत आहे.