esakal | पुण्यात रेमेडिसिव्हिरविना ९१ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

बोलून बातमी शोधा

91-year-old grandfather overcome corona in Pune without remdesivir
पुण्यात रेमेडिसिव्हिरविना ९१ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात
sakal_logo
By
अशोक गव्हाणे

कात्रज : सध्या कोरोनामुळे अनेकजण त्रस्त असताना एक सकारात्मक बातमी समोर आली असून रेमेडिसिव्हरचा तुटवडा असल्याने त्याच्या वापराशिवाय का ९१ वर्षाच्या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. कात्रजमधील साई स्नेह कोविड सेंटरमध्ये उपचारानंतर वसंतराव पिसाळ (वय ९१) आणि सुचेता केसरकर (वय ७१) या ज्येष्ठ नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला.

कात्रजमध्ये सातारा रस्त्यावरील हॉटेल रॉयल येथे हे साई स्नेह कोविड सेंटर आहे. व्हेंटीलेटर बेड वगळता अन्य सर्व सुविधा येथे आहेत. ४० कोविड रुग्णांवर उपचाराची सुविधा येथे आहे. येथे उपचारासाठी दाखल झालेल्या आणि कोविड मधून बऱ्या झालेल्या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.(91-year-old grandfather overcome corona in Pune without remdesivir)

हेही वाचा: 20 दिवसानंतर पुण्यात पेट्रोल-डिझेल महागलं; पाहा आजचे दर

हेही वाचा: 'आमचे दोन्ही देव चोरीला गेले हो...' दोन्ही मुले गमावलेल्या ज्येष्ठ मातापित्यांचा टाहो

यावेळी कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. सुनील जगताप म्हणाले, 'कोविड साथीची परिस्थिती असाधारण आहे. या दोन रुग्णाबरोबर वसंतराव पिसाळ, नितीन बांदल, निता सूर्यवंशी, रवींद्र गोळे, सुचिता केसरकर, संदीप निगडे या ६ कोविड रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. या रुग्णांना प्रोटोकॉल नुसार, आयसीएमआर गाईडलाईन नुसार उपचार करण्यात आले, रक्त पातळ होण्याची औषधे देण्यात आली. अँटी फंगल ट्रीटमेंट देण्यात आली.

यावेळी डॉ. सुमीत जगताप, येथील वॉर्डबॉय, परिचारिका यांनी टाळया वाजवत, नातेवाईकांच्या उपस्थितीत आनंद व्यक्त डिस्चार्ज दिला आणि घरी जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा