esakal | 'आमचे दोन्ही देव चोरीला गेले हो...' दोन्ही मुले गमावलेल्या ज्येष्ठ मातापित्यांचा टाहो

बोलून बातमी शोधा

corona infection
'आमचे दोन्ही देव चोरीला गेले हो...' दोन्ही मुले गमावलेल्या ज्येष्ठ मातापित्यांचा टाहो
sakal_logo
By
यूनूस तांबोळी

टाकळी हाजी ः कोरोनामुळे(covid19) विशाल कृष्णकांत गायकवाड (वय 36) 22 एप्रिल आणि तुषार कृष्णकांत गायकवाड (वय 27) 3 मे ला कोरोनामुळे(corona infection)मृत्यू (death) झाला. सख्खे भाऊ (two brothers) असून, दहा दिवसांत दोन कर्त्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कृष्णकांत गायकवाड (वय ६२) व पत्नी मंगल (वय ५६) यांनी टाहो फोडला. (two brothers die of corona infection).

हेही वाचा: पिंपरी : मुलांचे अपहरण करून अश्लील कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा

वृद्धापकळात डोळ्यांदेखत कोरोनामुळे उध्वस्त झालेला संसार या वृद्ध दांपत्याच्या जिव्हारी लागला आहे. दहा दिवसांत दोन मुलांचा मृत्यू या घटनेमुळे मलठण (ता. शिरूर) येथे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सूर्या सांगवी (ता. पारनेर) जिल्हा नगर येथील कृष्णकांत व मंगल ह्यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी मलठण (ता. शिरूर) येथे आले होते. मोलमजुरी करीत प्रामाणिकपणे संसाराचा गाडा ओढत असताना प्रपंच वेलीवर विशाल, सागर, तुषार ही तीन मुले आणि प्रियंका ही मुलगी जन्माला आली. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून विशाल १० वी तर तुषार एम. ए. (हिंदी) पर्यंत शिक्षण घेतले. नोकरीच्या शोधात निराश झाल्यावर विशाल व तुषारने मलठण येथेच शौर्य कॉम्पुटर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून व्यवसाय उभारला. मनमिळाऊ स्वभाव, गरिबीची जाणीव, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर व्यवसाय भरभराटीला आला. मधल्या काळात विशाल, सागर आणि प्रियांका यांची लग्न झाली. तुषार अविवाहित होता, पण यंदा त्याचेही लग्न जुळून येत होते.

हेही वाचा: पुणे मार्केटयार्डातील फळविभागामधील बारा बेशिस्त अडत्यांवर दंडात्मक कारवाई

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा फटका ह्या कुटुंबाला बसला. विशालला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्याकडे दुर्लक्ष झाले आणि आजार अंगावर काढला, त्यामुळे (ता. २२) एप्रिलला विशालचा मृत्यू झाला. त्याचे सर्व अंत्यसंस्कार तुषारने केले आणि दोन दिवसांत तो ही पॉझिटिव्ह आला. त्रास होऊ लागल्याने तुषारला वेदांत हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र ऑक्सिजन कमी आल्याने १० दिवस त्यानेही मृत्यूशी झुंज दिली. ह्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने अनेक मित्रमंडळींनी निधी जमविला. त्याला मानसिक, आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. तुषारचा देखील (ता. ३) मे ला मृत्यू झाला. 'आमचे दोन्ही देव चोरीला गेले हो....त्यांना कुठे शोधू?...'हा वृद्ध मातापित्यांचा टाहो आसमंतात विरून गेला....! ही घटना अगदी काळजाचा ठोका चुकविणारी ठरली. एकटे पडलेल्या कुटूंबास आता मदतीचा ओघ निर्माण करून देण्याची वेळ आल्याचे त्यांचे जवळचे मित्रमंडळी व नातेवाईक बोलू लागले आहेत.