Indapur Accident : पुणे-सोलापूर मार्गावर भरधाव टँकरची दुचाकीला धडक; 94 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू, वाहनासह चालक फरार

भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने ९४ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Prataprao Devkar

Prataprao Devkar

sakal

Updated on

इंदापूर - पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील वनगळी गावच्या हद्दीत भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात टँकरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने ९४ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून टँकरचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com