
निरगुडसर : सायकल चालवा आणि निरोगी रहा,मनुष्याला निरोगी आयुष्य व निसर्गाचे प्रदूषण हानी कमी व्हावी आणि आपलं गाव शहर देश प्रदूषण मुक्त व्हावा हा संदेश देत आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथील डॉ.संजय वाघ आणि शरद वाघ या दोन युवकांनी रांजणी ते ओरिसा असा १६६१ किलोमीटर सायकल प्रवास सहा दिवसात पूर्ण केला,आत्तापर्यंत ह्या दोघांनी कन्याकुमारी,तिरुपती बालाजी,गिरणार पर्वत,त्रिंबकेश्वर,भीमाशंकर पंढरपूर,कोल्हापूर आदी ठिकाणी सायकल स्वारी करत सात हजाराहून अधिक किलोमीटर सायकल स्वारी पूर्ण केली आहे.