esakal | मधुमेहींच्या जखमा लवकर भरुन काढणारं जैविक बॅंडेज; मराठी शास्त्रज्ञांचं संशोधन
sakal

बोलून बातमी शोधा

मधुमेहींच्या जखमा लवकर भरुन काढणारं जैविक बॅंडेज; मराठी शास्त्रज्ञांचं संशोधन

मधुमेहींच्या जखमा लवकर भरुन काढणारं जैविक बॅंडेज; मराठी शास्त्रज्ञांचं संशोधन

sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

पुणे : मधुमेही व्यक्तीला जर जखम झाली तर ती लवकर भरून येत नाही. तसेच आगीमध्ये भाजलेल्या व्यक्तीच्याही जखमा भरण्यास जास्त कालावधी लागतो. देशात मधुमेहींचे प्रमाण सर्वाधिक असून, अशा समस्यांना तोंड देणारी लोकसंख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. आता अशा जखमा लवकर बऱ्या करण्यासाठी मराठी शास्त्रज्ञांनी एका जैविक बॅंडेजची निर्मिती केली आहे.

पुण्यातील राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेच्या (एनसीसीएस) माजी शास्त्रज्ञ आणि सिंबायोसिस सेंटर फॉर स्टेम रिसर्चच्या विभागप्रमुख डॉ. वैजयंती काळे आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या रासायनिक अभियंता विभागाचे प्रा.जयेश बेल्लारे यांनी यासंबंधी संशोधन केले आहे. अस्थिमज्जेतील पेशींच्या माध्यमातून विकसित केलेल्या पेशीकल्चरचा यासाठी वापर करण्यात आला आहे. पेरिफेरल रक्तपेशींचा(एन्डोथेलीयल प्रोजेनेटर पेशी ) वापरातून रक्तवाहिन्यांची जखम भरून काढता येते. या पेशींच्या वाढीसाठी आणि आधारासाठी शास्त्रज्ञांनी एक जाळी (मॅट्रीक्स) विकसित केली आहे. मधुमेही उंदरांवर यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

याबाबत बोलताना एनसीसीएसच्या माजी शास्त्रज्ञ डॉ. वैजयंती काळे म्हणाल्या की, ज्यांच्या जखमा भरून निघत नाही अशा सर्वांना या संशोधनाचा फायदा होणार आहे. आमच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून या बॅंडेजचे पेटंटही आम्ही प्राप्त केले आहे. आता फक्त प्रत्यक्ष उत्पादनासाठी उद्योगांशी करार अपेक्षीत आहे.

हेही वाचा: 'दोनहून अधिक मुलं असणाऱ्यांना सरकारी नोकरी-निवडणूक लढवता येणार नाही'

काय आहे संशोधन ?

- मधुमेह नसलेल्या व्यक्तीच्या अस्थिमज्जेतील एन्डोथेलीयल प्रोजेनेटर पेशी मिळविल्या

- या पेशींच्या वाढीसाठी सुक्ष्मजाळी विकसित करण्यात आले

- त्यावर या पेशींच्या वाढीसाठी योग्य वातावरण असते

- ही जाळी मधुमेही व्यक्तीच्या जखमेवर लावण्यात येते

- जाळीवरील पेशी रक्तवाहिण्यांच्या पेशींच्या वाढीसाठी मदत करतात

- पर्यायाने संबंधित जखम भरून येते

हेही वाचा: Video : 'हेच आमचे देव', बार मालकाने केली वडेट्टीवारांच्या फोटोची पूजा

संशोधनाचा फायदा :

- मधुमेहींच्या जखमा भरून काढण्यासाठी एक प्रभावी पर्याय

- जळाल्यामुळे झालेली जखमेसाठी उपयोगी

- जखमेच्या ठिकाणचे केस गळाले असल्यास त्यांची पुन्हा वाढ करणे शक्य होईल

- ज्या व्यक्तीच्या जखमा लवकर भरून निघत नाही, अशा सर्वांसाठी फायदेशीर

- जखमेमुळे वाढणारा शारीरिक आणि मानसिक त्रासापासून सुटका

loading image