
पिंपरी : आळंदी ते पंढरपूर हा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचा मार्ग पिंपरी-चिंचवड शहरातून जातो. महापालिकेने या मार्गावर चोविसावाडी ते दिघीदरम्यान साधारण बारा किलोमीटर अंतरावर जणू वारकरी सोहळाच उभारला आहे. आठ पदरी प्रशस्त मार्गावर ठिकठिकाणी संतांचे विचार, पालखी सोहळ्याचे महत्त्व, वारकरी संप्रदायाच्या पाऊलखुणा बघायला मिळतात. प्रवासादरम्यान त्या दृष्टीस पडताच नकळतपणे हात जोडले जाऊन नमस्कार केला जातो आणि भक्ती आणि श्रद्धेची अनुभूती येते.