Shiv Jayanti : भंडारा डोंगरावर भक्ती-शक्तीचा संगम ; माघ शुद्ध दशमी-शिवजयंतीनिमित्त राज्यातील दीड लाख भाविकांची वारी रुजू

संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेण्यासाठी लागलेली भाविकांची रीघ, ‘मोगरा फुलला’तून गणेश शिंदे वैचारिक प्रबोधन, सन्मिती शिंदे यांनी गायलेली अभंगवाणी, मेघना झुझम यांचा तुकोबारायांच्या जीवनावर आधारावर साकारलेली नाटिका
Shiv Jayanti
Shiv Jayanti sakal

इंदोरी : संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेण्यासाठी लागलेली भाविकांची रीघ, ‘मोगरा फुलला’तून गणेश शिंदे वैचारिक प्रबोधन, सन्मिती शिंदे यांनी गायलेली अभंगवाणी, मेघना झुझम यांचा तुकोबारायांच्या जीवनावर आधारावर साकारलेली नाटिका, चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी सांगितलेला कीर्तनातून तुकोबारायांचा महिमा..अशा भक्तिरसात चिंब झालेल्या वातावरणात भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने सुमारे दीड लाख भाविकांनी संत तुकाराम महाराजांच्या चरणी आपली वारी रुजू केली. माघ शुद्ध दशमी आणि शिवजयंती हा अनोखा योगायोग आल्याने आज येथे भक्ती-शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

संत तुकाराम महाराजांच्या अनुग्रह दिनानिमित्त आयोजित माघ शुद्ध दशमीच्या सोहळ्याचा आज मुख्य दिवस होता. त्यासाठी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मुख्य मंदिरापासून मोठी रांग लागली होती. काकडा आरती झाल्यानंतर श्री पांडुरंग व संत तुकाराम महाराजांच्या मूर्तींना संत तुकाराम सहकारी कारखान्याचे संचालक मंडळाच्या हस्ते अभिषेक करून महापूजा केली. गाथामूर्ती नानामहाराज तावरे यांच्या सुमधुर वाणीतून गाथा पारायण झाले. दिंडीने भंडारा डोंगराला प्रदक्षिणा घातली. महिलांनी फुगड्या खेळल्या, फेर धरला. सकाळी दहा वाजता सुरू झालेला अन्नप्रसाद रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

Shiv Jayanti
Pune News : हॉटेल, पबवर राहणार पोलिस पथकांचा ‘वॉच’ ; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

दुपारी गायिका सन्मिती शिंदे व सहकारी यांनी ‘मोगरा फुलाला’ हा अभंगवाणीचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट म्हणजे शिवचरित्रकार प्रा. गणेश शिंदे यांचे लाभलेले निरूपण. शिवजयंती व माघ शुद्ध दशमीचे औचित्य साधून प्रा. शिंदे यांनी खास शैलीमध्ये निरुपणातून तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, शिवा काशीद, हिरोजी इंदलकर यांच्या पराक्रमाचे, शौर्याचे व राजांच्या प्रति असणारी निष्ठा असे अनेक प्रसंग सांगत उपस्थित भाविकांना शिवमय केले. मेघना झुझम लिखित आणि त्यांच्याच अभिनयाने नटलेला ‘तुझीया नामाचा गजर’ विशेष कार्यक्रम सादर केला. त्यात संत तुकाराम महाराजांवर जीवन चरित्रावर आधारित अनेक प्रसंग सादर केले.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले, माजी आमदार विलास लांडे, ज्ञानेश्वर लांडगे आदींनी सोहळ्याला भेट दिली. संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे काम पन्नास टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. लोकवर्गणी आणि दानशुरांच्या देणगीतून हे मंदिर पूर्णत्वाकडे जात आहे. मंदिर पूर्ण करून घेण्यास तुकोबाराय समर्थ आहेत. भाविकांनी माघ शुद्ध दशमीबरोबर नियमित डोंगरावर दर्शनाला यावे. संत तुकाराम महाराजांच्या साधनाभूमीच्या सहवासात जीवन सार्थकी लावावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी केले.

डोंगर परिसर ‘शिवमय’

शिवजयंतीनिमित्त भंडारा डोंगरावर मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्य मंदिरात शिवज्योत प्रज्वलित करून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. देवांश हिंगे, अगस्त पिंपरकर हे बाल शिवाजीच्या वेशभूषेत व वीरा घाटगे ही जिजाऊ माँसाहेबांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. आर्या चव्हाण व विद्या काशीद आणि उपस्थित महिलांनी शिवरायांचा पाळणा सादर केला. युवा कीर्तनकार अजय महाराज बारस्कर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा ‘गड आला पण सिंह गेला’ हा पोवाडा सादर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com