

Struggle for Water Continues: Woman Falls into Well, Suffers Severe Injuries
sakal
वेल्हे : राजगड तालुक्यातील दुर्गम चांदर येथे विहिरीतून पाणी शेंदताना तोल जाऊन पडल्याने आशा अनिल सांगळे (वय ३४) या गंभीर जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी (ता. १६) घडली असून, त्यांच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.