
पुणे : भरधाव कारने भिक्षेकरी महिलेसह तिच्या दिड वर्षांच्या बाळाला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने दोघींचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी 3.30 वाजता कोंढवा परिसरात घडली. दरम्यान, या अपघातातून भिक्षेकरी महिलेची तीन वर्षांची मुलगी बचावली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या महिलेची व बाळाची अद्याप ओळख पटलेली नाही. मृत महिलेचे वय अंदाजे ३५ वर्ष आहे, तर बाळाचे वय दिड वर्ष आहे. याप्रकरणी श्रेयस कुरले (रा. मोहम्मद वाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या कारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विशाल कांबळे यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सहायक पोलिस निरिक्षक पी. पी. डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील येवलेवाडी परिसरातील कमानीजवळ गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता भिक्षेकरी महिला ही तिच्या दिड वर्षाच्या बाळाला घेऊन चौकात भिक्षा मागत होती. त्यावेळी तिथून जाणाऱ्या भरधाव कारने भिक्षेकरी महिला तिच्या बाळाला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या भिक्षेकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कारचालकाने जखमी बाळाला उपचारासाठी भारती रूग्णालयात दाखल केले, मात्र बाळाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
अपघातानंतर तीन वर्षांची मुलगी चौकात रडत होती. पोलिसांनी तिला आपल्याकडे घेऊन 2 दिवस परिसरात चौकशी केली, मात्र तिच्याविषयी माहिती मिळाली नाही, त्यानंतर ती मुलगी भिक्षेकरी महिलेची असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी मुलीला ससून रूग्णालयाच्या आवारातील सोफोश संस्थेत दाखल केले आहे. अद्याप महिलेची ओळख पटलेले नाही. तिच्याबाबत काही माहिती असल्यास त्वरीत कोंढवा पोलीस ठाणे (०२०-२६९३०७८०) किंवा सहायक पोलिस निरीक्षक पी.पी.डोईफोडे (मोबाईल क्रमांक-९५५२५५२९०१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.