

At the Threshold of 70, Ramdas Murkute’s 1,400 Sinhagad Treks Inspire Many
sakal
पुणे : निसर्गप्रेम, जिद्द आणि सातत्य यांचे प्रेरणादायी उदाहरण ठरलेल्या रामदास मुरकुटे यांनी गेल्या २५ वर्षांत तब्बल १४०० हून अधिक वेळा सिंहगड सर करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुरकुटे यांनी मित्र अप्पा मुंगारे यांच्यासोबत वाढदिवसानिमित्त २ जून २००१ या दिवशी प्रथमच सिंहगड सर केला अन् हा गड त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला.